शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील एका शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुणाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत शेती, हॉटेल व्यवसाय आणि आता पेट्रोल पंप असा यशस्वी प्रवास केला आहे. मेहनत, चिकाटी आणि कुटुंबीयांची साथ यांच्या जोरावर व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सचिनभाऊ गोंदकर हे त्याचे आदर्श उदाहरण ठरले आहे.
शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या सुमारे वर्षभरापासून बंद होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना इंधन भरण्यासाठी जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावर जावे लागत होते. त्यामुळे नागरिक आणि भाविकांची मोठी गैरसोय होत होती.
मात्र आता ही प्रतीक्षा अखेर संपली असून, सचिनभाऊ गोंदकर यांचा इंडियन ऑइल पेट्रोल पंप पुन्हा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यान्वित झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा पंप पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच शिर्डीत येणाऱ्या हजारो साईभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
▪️आई-वडील, पत्नी आणि मित्रांची मोलाची साथ▪️
सचिनभाऊ गोंदकर यांच्या या व्यावसायिक यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार, पत्नीची साथ आणि मित्रांचे सहकार्य यांचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात. शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने बदलत्या काळानुसार व्यवसायाच्या विविध क्षेत्रात पाऊल ठेवत आपली वाटचाल सुरू ठेवली.
▪️शेतीपासून हॉटेल व्यवसाय आणि त्यानंतर पेट्रोल पंप व्यवसायापर्यंतचा त्यांचा प्रवास हा तरुण उद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
◾‘ग्राहकांची सेवा हीच साईंची सेवा’◾
शिर्डी ही साईबाबांच्या नगरीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगली सेवा मिळावी, हा विचार डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल पंप पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
‘ग्राहकांची सेवा हीच साईंची सेवा’ हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सचिनभाऊ गोंदकर यांनी पेट्रोल पंपाच्या पुनर्प्रारंभानंतर इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी तसेच आपल्या सर्व कर्मचारीवर्गाचे विशेष आभार मानले.
पेट्रोल पंप पुन्हा सुरू झाल्यामुळे शिर्डीकरांची गैरसोय दूर झाली असून, साईभक्तांसाठीही इंधनाची सुविधा पुन्हा त्यांच्या जवळ उपलब्ध झाली आहे.
राजेंद्र भुजबळ
शिरडी MIRROR
संचालक, मुख्य संपादक शिर्डी.
88887777
