▪️रुग्णाच्या वेदनादायी प्रवासाला मिळाला दिलासा.
संपादकीय, राजेंद्र भुजबळ
वैद्यकीय क्षेत्रात अनेक वेळा अशा काही उपचारकथा समोर येतात, ज्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आशेचा किरण ठरतात. राहाता येथील साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या चंद्रशेखर मधुकरराव झोडगे झोडगे साहेब यांची अशीच एक अनुभवकथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
▪️अहिल्यानगर येथील रहिवासी असलेले झोडगे साहेब गेल्या १४ ते १५ वर्षांपासून ‘कॉम्प्लेक्स फिस्टुला इन अॅनो’ (भगंदर) या त्रासदायक आजाराने त्रस्त होते. या काळात त्यांनी अहिल्यानगरसह सोलापूर, पुणे आणि मुंबई येथील विविध तज्ज्ञांकडे उपचार घेतले. लेझर, क्षारसूत्र तसेच ओपन फिस्टुलेक्टॉमी अशा विविध पद्धतींच्या तब्बल ५ ते ६ शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, तरीही अपेक्षित आराम मिळाला नाही.
▪️विविध उपचार करूनही त्रास कायम▪️
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासामुळे रुग्ण अक्षरशः त्रस्त झाले होते. एलोपॅथी उपचारांसोबतच त्यांनी युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच विविध पारंपरिक उपचारांचाही आधार घेतला. मात्र अपेक्षित परिणाम न मिळाल्याने त्यांचा वैद्यकीय उपचारांवरील विश्वासच कमी झाला होता.
अशा परिस्थितीत त्यांच्या मानलेल्या मुलाने आग्रह धरून त्यांना राहाता येथील साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. किरण गोरे (MBBS, MS, Coloproctologist) यांच्याकडे आणले.
३०० ते ४०० पानांची फाईल पाहून उपचार सुरू
सुरुवातीला रुग्णाची मानसिकता उपचार घेण्याची नव्हती. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उपचार करूनही फायदा झाला नाही, मग राहाता येथील उपचारांनी काय फरक पडणार, अशी शंका त्यांच्या मनात होती.
मात्र डॉ. किरण गोरे यांनी रुग्णाची सुमारे ३०० ते ४०० पानांची जुनी वैद्यकीय फाईल आणि उपलब्ध रिपोर्ट्सचा सखोल अभ्यास केला. रुग्णाची सद्यस्थिती तपासून पुढील उपचार व वैद्यकीय मार्गदर्शन सुरू करण्यात आले.
▪️पहिल्या १५ दिवसांतच फरक जाणवला▪️
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत रुग्णाच्या त्रासात लक्षणीय सुधारणा जाणवू लागली. यापूर्वी जखमेतून होणारा स्त्राव व पू पुसण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात कापूस लागायचा, मात्र उपचारानंतर हा त्रास जवळपास थांबल्याचे त्यांनी सांगितले.
दुखणे कमी झाले, दैनंदिन जीवनातील अडचणी कमी झाल्या आणि प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा झाल्याचा अनुभव रुग्णाने व्यक्त केला. उपचाराच्या कालावधीत त्यांचे ८ ते ९ किलो वजन वाढल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
▪️डॉक्टरांवरील विश्वास पुन्हा निर्माण▪️
उपचारानंतर झोडगे साहेब यांनी स्वतः साई अभिनव हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ. किरण गोरे यांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली. अनेक वर्षांच्या त्रासानंतर मिळालेल्या या दिलास्यामुळे त्यांचा पुन्हा वैद्यकीय उपचारांवरील विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णाच्या कुटुंबीयांनीही डॉ. गोरे यांच्या उपचारपद्धतीचे कौतुक करताना, “मोठ्या शहरांमध्ये मिळणारे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य ग्रामीण भागातील तज्ज्ञ डॉक्टरांमध्येही आहे; मात्र रुग्णाविषयीची आपुलकी आणि वैयक्तिक लक्ष हे विशेष महत्त्वाचे आहे,” अशी भावना व्यक्त केली.
◾‘Miracles do happen’ म्हणण्यामागची रुग्णाची भावना◾
१४-१५ वर्षांचा आजार, अनेक उपचार आणि शस्त्रक्रिया, त्यानंतरही कायम असलेला त्रास आणि अखेर राहता येथे मिळालेला दिलासा—या संपूर्ण प्रवासामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी हा अनुभव निश्चितच अविस्मरणीय ठरला आहे.
“Miracles do happen” अशी भावना व्यक्त करत, डॉ. किरण गोरे आणि त्यांच्या टीमचे रुग्णाच्या कुटुंबीयांनी मनापासून आभार मानले.
▪️डॉ. किरण गोरे — MBBS, MS, Coloproctologist
साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता
संपर्क : 9405000454 / 9270245254
राजेंद्र भुजबळ
शिरडी MIRROR
संचालक, मुख्य संपादक शिर्डी.
8888777711
